तळवली येथे 12 रोजी विराट हिंदू संमेलन

गुहागर | प्रतिनिधी
हिंदू जागरणाच्या दिशेने नवीन ऊर्जा व चेतना निर्माण करण्याचे हेतूने सकल हिंदू समाजाच्या वतीने सनातन संस्कृती सनातन धर्म व सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून रविवार दिनांक 12 रोजी भव्य हिंदू संमेलन सिद्धिविनायक मंदिर तळवली येथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी वेळंब येथील बबन महाराज कुंभार हे प्रमुख अतिथी असणार आहेत तर डॉक्टर विवेक वडके ठाणे प्रांत सहसंयोजक कुटुंब प्रबोधन हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. रविवार दिनांक 12 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हे संमेलन पार पडणार असून यामध्ये दीप प्रज्वलन सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य अतिथी संबोधन वंदे मातरम व प्रसाद असा कार्यक्रम असणार आहे या संमेलनासाठी सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदू समाज द्वारे करण्यात आले आहे.