गीतरामायण वर आधारित स्पर्धात्मक गीतगायन स्पर्धेत मंदार सांबारी प्रथम

आचरा-अर्जुन बापर्डेकर

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे तर्फे हनुमान जयंती निमित्त आयोजित

गीतरामायण वर आधारित स्पर्धात्मक गीतगायन मन हे रामरंगी रंगले स्पर्धेत मंदार सांबारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रवींद्र गुरव यांच्या संकल्पनेतून गदीमाडगूळकर रचित आणि सुधीर फडके यांनी संगीत बद्ध केलेल्या गीतरामायणवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रमात प्रथम क्रमांकासाठी पाच स्पर्धकांची तर द्वितीय क्रमांक साठी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.यात प्रथम क्रमांक मंदार सांबारी, गीतांजली कुलकर्णी,सुमित विनोद कदम, ऋग्वेद जोशी, रविंद्र पाटील यांची निवड करण्यात आली.तर द्वितीय क्रमांकसाठी ज्ञानप्रभा जोशी, संपदा दुखंडे, जितेंद्र राणे, आर्या आचरेकर, सलोनी मेस्त्री यांची निवड करण्यात आली.विजेत्यांना रोख रक्कम व जयप्रकाश परुळेकर पुरस्कृत सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.उत्तेजनार्थ तीन बक्षिसे सचिन गुळगळे यांच्या तर्फे रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेची सुरुवात साहित्यिक सुरेश ठाकूर यांच्या प्रास्ताविकेने झाला.प्रत्येक गीतामागील अर्थ आणि रामकथा निवेदन उदय वेलनकर कुडाळ यांनी केले.स्पर्धेचे परीक्षण माधव गावकर यांनी केले.संगीत साथ हार्मोनियम शाम तेंडोलकर यांनी तर तबला साथ सिद्धेश कुंटे यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश भिरवंडेकर यांनी केले