पेट्रोल पंप ते रेडकर हॉस्पिटल मार्गांवर गटार बांधणे कामाचा शुभारंभ

 

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निधी मंजूर

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर सन 2025-26 अंतर्गत मालवण नगरपरिषद क्षेत्रातील पेट्रोल पंप ते रेडकर हॉस्पिटल मार्गांवर गटार बांधणे कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला आहे.

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हे काम मंजूर झाले असून सुमारे 12 लाख 55 हजार निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व नगरसेवक ललित चव्हाण यांनी दिली.

भूमिपूजन प्रसंगी नगराध्यक्षा ममता वराडकर यांसह उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका अनिता गिरकर, नगरसेविका निना मुंबरकर, नगरसेविका महानंदा खानोलकर, नगरसेवक महेश कोयंडे, माजी नगरसेवक बाबू कांदळकर, संतोषी कांदळकर, बाबा मोंडकर, पंकज सादये, ॲड. अक्षय सामंत, शशिकांत सामंत, बाबू कांदळकर, रत्नाकर सामंत, सचिन शालबिद्रे, शाम नार्वेकर, तुळसकर मॅडम, दुर्गेश गांवकर, उत्सुक गांवकर, धनेश हडकर, अभी कांदळकर अक्षय माणगांवकर यांसह पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.