भाजपा मालवण तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली तहसीलदारांची भेट
मालवण तालुक्यात 100 बंधारे उभारणी करण्याचा भाजपचा संकल्प
शेती पंचनामे प्रक्रियेतही मदतीसाठी भाजपा पदाधिकारी प्रशासना सोबत
मालवण | प्रतिनिधी : पावसाचा खंड आणि त्यामुळे सर्वदूर निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांचे नुकसान आणि आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता घेता लक्षात शासन शेतकरी व जनते सोबत आहे. दुष्काळ जाहीर करून शेती पंचनामे व अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेले शेती पंचनामे व विविध उपाययोजनांना सहकार्य करण्यासाठी भाजपा मालवण तालुका पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रशासनास सहकार्यासाठी भाजपा तत्पर आहे. शेती पंचनामे प्रक्रियेतही मदतीसाठी भाजपा पदाधिकारी प्रशासनास आवश्यक ते सर्व सहकार्य करतील. त्यासोबतच भाजपा मालवण तालुक्यात 100 बंधाऱ्यांची उभारणी करणार असल्याचे भाजपा मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार गणेश लव्हे यांची भेट घेत चर्चा केली. शेतीचे सरसकट पंचनामे होत असताना एकही शेतकरी या प्रक्रियेतून वंचित राहता नये. पंचनाम्यांची प्रक्रिया जलदगतीने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत प्रशासनाच्या सूचना पोहोचविण्यासह पंचनामे प्रक्रियेत आवश्यक मदत करण्यासाठी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासनाच्या सोबत राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांमध्ये शेती आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी शासन तसेच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा मालवण तालुक्याच्या वतीने तालुक्यात १०० बंधारे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात दहा बंधारे उभारणी पूर्ण झाले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
गावागावात उपलब्ध असलेल्या स्थानिक साधनसंपत्तीचा वापर करून छोटे माती बंधारे, जलसंधारणाच्या उपाययोजना आणि पाणी अडविण्याची कामे करण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यास तसेच आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल, असा उद्देश आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास तालुक्यातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे उपाययोजना करता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे, पाणीटंचाई आणि जलसंधारणाच्या कामांसाठी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याचा निर्धार भाजपा मालवण तालुका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, महेश मांजरेकर, जिप सदस्यां क्षमा हडकर, भाजपा महिला मोर्चा मालवण तालुका ग्रामीण अध्यक्ष ॲड. समृद्धी आसोलकर, ओबीसी मोर्चा महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, अंशून गावडे, किशोर पेडणेकर, रोहेश गांवकर, सुमित सावंत, प्रवीण घाडीगावकर, प्रमिला पाताडे, सुशांत सुर्वे, सुशील गावडे, राजन आंबेरकर, संदीप हडकर यांसह भाजपा मालवण तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













