RR vs RCB सामन्यात आज रंगणार 5 मोठ्या खेळाडूंच्या लढती

 

गुवाहाटीमध्ये टेबल-टॉपर्सचा महामुकाबला
आजच्या सामन्यात ठरणार निर्णायक द्वंद्वयुद्ध

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आज गुवाहाटी येथे मोठा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत अपराजित कामगिरी करत स्पर्धेत जोरदार सुरुवात केली आहे. या सामन्यात काही प्रमुख खेळाडूंमधील लढती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील संघर्ष सामन्याचा कल बदलू शकतो. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष या 5 मोठ्या द्वंद्वयुद्धांवर असेल.


पुणे : राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यात 10 एप्रिल 2026 रोजी गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर सामना रंगणार आहे. RR ने 3-0 तर RCB ने 2-0 अशी अपराजित सुरुवात केली असून दोन्ही संघ विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरतील.

विराट कोहली विरुद्ध संदीप शर्मा ही आजच्या सामन्यातील सर्वात चर्चेची लढत मानली जाते. संदीप शर्माने कोहलीला अनेकदा बाद करत त्याच्यावर वर्चस्व राखले आहे, त्यामुळे ही भिडंत पुन्हा रंगणार आहे.

वैभव सूर्यवंशी विरुद्ध भुवनेश्वर कुमार ही तरुणाई आणि अनुभवाची टक्कर असेल. सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीला भुवनेश्वरचा स्विंग गोलंदाजीने रोखण्याचे आव्हान असेल.

रवी बिश्नोई विरुद्ध रजत पाटीदार यांच्यातील मधल्या षटकांतील लढत निर्णायक ठरू शकते. पाटीदारने यापूर्वी बिश्नोईवर आक्रमक खेळी करत वरचष्मा मिळवला आहे.

फिल सॉल्ट विरुद्ध जोफ्रा आर्चर यांच्यातील पॉवरप्लेतील सामना रोमांचक होणार आहे. सॉल्टने आर्चरच्या वेगाचा प्रभावीपणे सामना केल्याचा इतिहास आहे.

यशस्वी जैस्वाल विरुद्ध जेकब डफी ही नवी आणि उत्सुकता वाढवणारी भिडंत असेल. जैस्वालच्या आक्रमक सुरुवातीला डफी कसा रोखतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.