कार्यकर्त्यांमध्ये उमेदीची भावना जागविणारे खंबीर नेतृत्व म्हणजेच खासदार नारायणराव राणे — तन्वी मोदी !

कार्यकर्त्यांमध्ये सदैव आदरयुक्त प्रेमाचा वर्षाव करणारे आमचे दादा ! — अजय रावराणे

निरामय आरोग्यासाठी विविध कार्यक्रमांनी खास .नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचा कोंडाघाटमध्ये शुभारंभ !

फोंडाघाट — कार्यकर्त्यांच्या मनात आदर आणि कार्यकर्त्यांना सन्मानाची, आपुलकीची आणि उमेदीची भावना जागवणारे खंबीर नेतृत्व खास. नारायणराव तथा दादा राणे च्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात फोंडाघाट मधील तमाम भाजपा स्थानिक नेतृत्व, कार्यकर्ते,दादा प्रेमी ग्रामस्थ यांच्यावतीने जल्लोषात सानंद करण्यात आली. सकाळी दहा वाजता एस टी स्टँड परिसरात फटाक्याच्या आतशबाजीत दादा राणे आगे बढोsss च्या बुलंद घोषणांनी आणि सदिच्छांनी परिसर दणाणला. स्टॅन्ड वरील प्रवासी,कर्मचारी यांना लाडू वाटप करताना सर्वसामान्य प्रवाशांनी दादांना उदंड आयुष्याच्या आणि निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

 

त्यापूर्वी लोरे नंबर एकचे ग्रामदैवत गांगो चाळा व घोणसरीचे श्री विघ्नविनाशक मंगलमूर्ती ग्रामदेवते कडे अभिषेकाद्वारे दादांना उत्तम आरोग्यासाठी साकडे घालण्यात आले. वाघेरी येथे दादांच्या जीवनपटावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रातील पेशंटसाठी ॲडजस्टमेंट बेड व जीवन आनंद संस्था फोंडाघाट ला वॉटर प्युरिफायर,जिल्हा परिषद गटामार्फत सस्नेह देण्यात आला.यावेळी डॉ. गणेश यादव यांचे सह दिलीप ईश्वलकर, महादेव कोकरे, आणि आरोग्यसेविका स्टाफ जीवन आनंद चे आशिष कांबळी, अनुराधा साटम, अनुजा सावंत आणि दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते…

 

 

 

संपूर्ण कार्यक्रमात जि. प. गटातील स्थानिक नेते पंचायत समिती सदस्य पवन भालेकर, लोरे सरपंच अजय रावराणे, तन्वी मोदी, विश्वनाथ जाधव, अलंकार रावराणे, दर्शना पेडणेकर, चंदू गुरव, प्रकाश वाघेरकर, मंगेश नेवगे, अजय चिक्के ,मिलिंद लाड, मिहीर मराठे, नरेश गुरव, दामोदर नारकर, विलास मराठे,सुरेश एकावडे,निलेश लाड, भाई तेली संतोष पारकर रुपेन चव्हाण, मंदार मराठे यांचे सह बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते आणि दादा प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…..