खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी पं. स. चा उपक्रम
सभापती सिद्धेश रावराणे, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित
वैभववाडी | प्रतिनिधी :
राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी पंचायत समितीच्या वतीने 75 स्तनदा व गरोदर मातांना किटचे वाटप करण्यात आले. सभापती सिद्धेश रावराणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. यावेळी इतर वयक्तिक लाभार्थ्यांना देखील शासनाकडून मंजूर झालेल्या शेती आवजारे व इतर वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे, मनस्वी कांबळे, विद्या गुरखे व खाते प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ग्रासकटर, पोर्टेबल पॉवर स्पेअर, स्प्रे पंप, शिलाई मशीन, सायकल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व वस्तूंचे वाटप करण्यात आले. घर दुरुस्ती, शेळ्या बोकड, मोबाईल, अपंग व्यक्ती घरकुल, तीन चाकी स्वयंचलित सायकल मंजुरी पत्रे वाटप करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.












