रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरुपानंद मंदरासमोर अज्ञात कारणातून प्रौढाला तेथील दुकानदाराने लोखंडी शिगेने मारहाण करत जखमी केले. मारहाणीची ही घटना बुधवार 8 एप्रिल रोजी रात्री 8.30 ते 8.45 वा.कालावधीत घडली आहे. याबाबत दुकान मालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरयु गणेश सुर्वे (43,रा.रनपार सुर्वेवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुकान मालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात जयदास कृष्णा मांडवकर (45,रा.नालेवठार मधलीवाडी पावस,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी रात्री जयदास मांडवकर हे आपले मोलमजूरीचे काम आटपून आपल्या घरी जात होते. ते पावस येथील स्वामी स्वरुपादंर मंदिर समोरुन जात असताना तेथील शॉपी मालक शरयु सुर्वे याने कोणत्यातरी गोष्टीचा राग मनात धरुन दुकानातील लोखंडी शिग जयदास मांडवकरच्या डोक्यात,कानावर,हातांवर,पायांवर आणि बरगडीवर मारुन दुखापत केली. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1),351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे













