कोतवडे येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कोतवडे-उंबरवाडी येथील तरुणाने गुरुवार 9 एप्रिल रोजी दुपारी 1 वा.सुमारास अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शैलेश रविंद्र पवार (37,रा.कोतवडे उंबरवाडी,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडिल रविंद्र पवार यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, ते गवंडी काम करण्यासाठी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी 8 वा.सुमारास गंवडी कामासाठी ते सड्ये येथे गेले होते. तसेच त्यांची पत्नी ही अंगणवाडीत कामानिमित्त गेली. त्यामुळे त्यांचा मुलगा शैलेश हा घरात एकटाच होता. दरम्यान, दुपारी 1 वा.सुमारास शैलेशची आई घरी परतली असता तिला घराचा दरवाजा आणि खिडकी बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने शैलेशचे वडिल रविंद्र पवार हेही घरी पतरले असता त्यांनी घराच्या मागील दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश केला असता त्यांना शैलेश घराच्या हॉलमधील लाकडी बाराला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी आरडोओरडा करता आजुबाजुच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीन घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.