खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मालवण | प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किर्लोस गावठण व आंबवणे शाळेला कॉम्पुटर भेट देण्यात आला. तसेच विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी उपसभापती राजू परुळेकर, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य सीमा परुळेकर, साक्षी चव्हाण, भावे, प्रवीण घाडीगावकर, गोपीनाथ लाड, शुभम बाक्रे, शुभम मठकर, युवासेना तालुकाप्रमुख अभी लाड, चिटणीस सुनील घाडीगावकर, मुख्याध्यापक राणे, शेवाळे सर, विध्यार्थी, पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते













