प्रतिनिधी/ रोहन कांबळे
राधानगरी: तालुक्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हवालदार सागर शंकर पाटील (वय ४३) यांचे पालम अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत असताना अपघात निधन झाले. पाटील हे गेले तीन वर्षे अरुणाचल प्रदेश येथे आपले कर्तव्य बजावत होते.नुकतीच त्यांची जम्मू-काश्मीर येथे बदली झाली होती. तेथे हजर होण्यापूर्वी त्यांच्यावर काळाने घाला घातला. अरुणाचल प्रदेश येथील १३८ पालम बटालियन येथे सेवा बजावत असताना गुरुवार दि.९ रोजी पहाटे त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला.सागर पाटील हे सन २००४ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते.२२वर्षात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावली आहे. सागर पाटील यांचे पार्थिव पालम येथून सोळंबी येथे मूळ गावी शनिवारी दि.११ एप्रिल रोजी आणण्यात येणार असून सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.













