वेंगुर्ले | प्रतिनिधी : वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा सुभाषवाडी ख्रिश्चनवाडी येथील अँथोनी फॅन्सीस डिसोजा (वय २३) या युवकाने राहत्या घराच्या समोरील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अँथोनी याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. याबाबत टेरेन्स डिसोजा यांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलीस हवालदार गवस अधिक तपास करत आहेत.













