खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मालवण | प्रतिनिधी : कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना मालवण – कुडाळ तर्फे जीवनावश्यक वस्तू व धान्यवाटप करण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा सचिव राहुल बागवे, कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर, मालवण तालुकाप्रमुख अभी लाड, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, उपतालुकाप्रमुख मंदार पडवळ, तालुका चिटणीस अमित चव्हाण, तालुका सचिव साई दळवी, विभागप्रमुख धनंजय परब, विभागप्रमुख गीतेश खेडेकर व योगेश कामतेकर उपस्थित होते.












