रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली

शिरगाव येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ४७ जणांचा सहभाग

शिरगाव (प्रतिनिधी) :     सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. नारायणराव राणे तसेच भाजप सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम यांच्या वाढदिवसानिमित्त शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ४७ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

देवगड तालुका भाजपा, संदीप साटम मित्रमंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (शाखा देवगड) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. नव्या युवा पिढीला रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे, तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे तसेच जिल्ह्यातील रक्तपेढी समृद्ध ठेवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, संतोष किंजवडेकर, शिरगाव जि.प. सदस्य देवानंद कदम, मिलिंद साटम, देवगड भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित साटम, मंगेश लोके, राजू शेट्ये, सुभाष नार्वेकर,वसंत साटम,संतोष फाटक, तळवडे सरपंच गोपाळ रूमडे, पंकज दुखंडे, महेश पाटोळे, सदानंद देसाई, सिंधु रक्तमित्रचे महेश शिरोडकर, उद्धव गोरे, अनुप बापट, यतीन पारधी, युध्दीराज राणे, माजी पोलीस पाटील चंद्रशेखर साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ढवळे, जिल्हा रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक आडपोड, सुमंगल बुगडे व त्यांच्या टीमने शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. शिरगाव जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.