▪️राकेश परब यांची उपस्थिती
मसुरे | झुंजार पेडणेकर मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक श्री राकेश परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राठीवडे गावातील प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी येथे विध्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.
शालेय विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक शैक्षणिक मदत भविष्यात केली जाईल असे राकेश परब म्हणाले. यावेळी राठीवडे सरपंच दिव्या धुरी, सदस्य स्वप्निल पुजारे,
बाळा धुरी, मनिष परब, सुभाष धुरी,
भिकाजी किंजवडेकर,
गुरुदास पांचाळ,सचिन पुजारे,अरुण मेस्त्री,प्रकाश मेस्त्री,
भगवान धुरी, प्रकाश खांबल, रमेश पवार,
प्रकाश धुरी, गणेश धुरी तसेच शाळेतील शिक्षक गावातील महिला उपस्थित होत्या. सरपंच दिव्या धुरी यानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक आभार शिक्षक श्री तांबे यानी मानले.












