दापोलीत भव्य मोफत आरोग्य शिबिर

दापोली(प्रतिनिधी):-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दापोलीत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्धजन सेवा संघ (मुंबई, तालुका दापोली-मंडणगड) आणि जेसीआय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत पार पडणार आहे. केळसकर नाका येथील चिंतामणी कॉम्प्लेक्स टेरेसवर हे शिबिर होईल.

या उपक्रमात नॅब चिपळूणतर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन, शितल फाउंडेशनतर्फे सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महिलांना मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन दिले जाईल. बौद्धजन सेवा संघातर्फे मोफत कापडी सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येणार असून, ब्रह्माकुमारीज दापोली सेवाकेंद्रातर्फे व्यसनमुक्ती समुपदेशनही केले जाईल.

कुणाल मेहता, पवन सावंत, तुषार भागवत, सुयोग भागवत, अनिल काकडे, अमित क्षीरसागर, पियुष सोनजे, ओंकार बागडे, समर्थ पेंढारे, स्वप्निल भोजने आणि महेंद्र पाटील हे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करतील.

गरज भासल्यास समीक्षा मेहता यांच्या केंद्रात सोनोग्राफीवर २०% सवलत दिली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी शरद जाधव (९४०४१५७७३४), प्रीतम रूके (७५८८९३३५५५) किंवा कुणाल मंडलिक (९०२८६६६९०१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे.