तिरवडे येथे अक्षय तृतीये निमित्त राज्यस्तरीय ढोलवादन स्पर्धेचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): तिरवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने श्री. राधाकृष्ण मंदिर, तिरवडे (इंदुलकरवाडी) येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी तीन दिवसीय अक्षयतृतीया उत्सव कार्यक्रम धार्मिक व पारंपरिक पद्धतीने दिनांक १७, १८ व १९ एप्रिल २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त “श्री. राधाकृष्ण प्रतिष्ठान” यांच्या वतीने अक्षयतृतीया या पवित्र आणि मंगलमय निमित्ताने राज्यस्तरीय ढोल स्पर्धेचे मंगळवार दि.१८ एप्रिल २०२६ रात्री ०८:०० वा राधाकृष्ण मंदिराच्या परिसरामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवातून परंपरा, कला आणि उत्साह यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.
श्री. राधाकृष्ण प्रतिष्ठान’तर्फे सामाजिक उपक्रम, आरोग्यनिधी तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी नेहमीच तत्पर असते. सामाजिक बांधिलकी तसेच मराठी अस्मिता जपतापना रोजी-रोटी साठी शहराकडे गेलेल्या लोकांना गावच्या परंपरेत रमवण्यासाठी अशा सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रुपये १०,००१/- व आकर्षक सन्मानचिन्ह, व्दितीय क्रमांकास रु. ७,००१/- व आकर्षक सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास रुपये ५,००१/- व आकर्षक सन्मानचिन्ह, उत्तेजणार्थ रोख रु. २,१००/- व आकर्षक सन्मानचिन्ह, तसेच उत्कृष्ठ ढोलवादक, उत्कृष्ठ ताशावादक, उत्कृष्ठ झांजवादक, (प्रत्येकी रोख रु.५०१/- व आकर्षक सन्मानचिन्ह), देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी श्री. राधाकृष्ण प्रतिष्ठान तर्फे कोणत्याही प्रकारची प्रवेश फी ठेवण्यात आलेली नाही याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. परंतु स्पर्धकांनी त्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी रु.१,०००/- रोख/ऑनलाईन ९०२९६४४५५७ या गूगल पे क्रमांकावरती भरणा करावी. (ही प्रवेश निश्चिती फी स्पर्धा चालू होण्यापूर्वी आपल्याला पुन्हा देण्यात येईल याची नोंद घ्यावी.) तसेच प्रथम येणा-या जास्तीत जास्त दहा ढोल पथक स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांतील पथकांनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमोद इंदुलकर आणि सचिव रेगन इंदुलकर यांनी केले आहे.