मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार

जि.प.सदस्य सौ मनिषा लाखण यांचे प्रतिपादन

लांजा (प्रतिनिधी):  जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून दिले त्यांच्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माझे नेहमीच प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ मनीषा लाखण यांनी वेरवली खुर्द पडवण येथे केले.
लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद गट आसगे मधील वेरवली खुर्द/पडवण गावात आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्य
सौ.मनिषा गणेश लाखण यांनी सर्व शासकीय योजनांचा विनामूल्य कॅम्प आज रविवारी आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या. सदर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या,
या कार्यक्रमाला शिवसेना विभाग प्रमुख दिनेश पवार , महिला विभाग संघटिका वेदिका पांचाळ, युवासेना उपविभागप्रमुख विजय पांचाळ,उपशाखाप्रमुख शिंदे, बूथप्रमुख अमोल बोडस, पोलीस पाटील मिलिंद बोडस, कार्यकर्ते अशोक मांडवकर, श्री.चव्हाण, श्री.जाधव, श्री.राणे, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य,गावातील सर्व महिला, ग्रामस्थ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.