लांजा नगरपंचायत निवडणूक, रविवारी सातव्या दिवशी तब्बल २३ उमेदवारी अर्ज दाखल

अपक्षांची संख्या सर्वाधिक, सोमवारी शेवटच्या दिवशी उमेदवार अर्ज दाखल करण्यास होणार प्रचंड गर्दी

लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज रविवारी सातव्या दिवशी तब्बल २३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये अपक्षांची संख्या ही सर्वाधिक म्हणजे ११ असून त्या पाठोपाठ भाजपा, शिवसेना उबाठा, काँग्रेस यांचा समावेश आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी देखील भाजप आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एक एक उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
लांजा नगरपंचायतीच्या १७ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात पहिल्या दोन-तीन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल केले नव्हते. त्यानंतर हळूहळू उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली. आज सातव्या दिवशी तब्बल २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
लांजा नगरपंचायत निवडणूकीसाठी आज रविवारी १६ नोव्हेंबर रोजी दाखल नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) पुढीलप्रमाणे – प्रभाग क्र. १४ – अपक्ष-१, भाजप १, शिवसेना उबाठा १. प्रभाग १३- अपक्ष २, भाजप १, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १,प्रभाग ११ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १, प्रभाग ९ – अपक्ष १,
प्रभाग ७- अपक्ष १, भाजप १, प्रभाग ५ – अपक्ष १,
प्रभाग ६ – अपक्ष १, प्रभाग ४ – अपक्ष १, भाजप १,
प्रभाग ३ – अपक्ष १, भाजप १, प्रभाग २ – अपक्ष १, भाजप १, प्रभाग १ – अपक्ष १, शिवसेना उबाठा १. तर नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष आणि भाजप यांच्याकडून प्रत्येकी १-१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
असे असले तरी सोमवारी १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून या दिवशी मोठ्या संख्येने सर्वच राजकीय पक्ष तसेच अपक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदासाठी देखील मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.