कोकणचा आंबा सापडला निसर्गचक्रात कर्नाटकी आंब्याची चलती…!

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.
कोकण प्रांतात कधीही हार मानून जगणारी माणसं नाहीत यामुळे जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरे जात काम करत रहाण्याचा कोकणवासियांचा स्वभावगुण आहे. कोकणातही अनेकवेळा फार बिकटस्थिती निर्माण करतो. परंतु निसर्गाने निर्माण केलेल्या परिस्थितीलाही सामोरे जात काम करत रहातात. हे खर असले तरी यावेळी कोकणातील शेतकरी चारहीबाजूने अडचणीत सापडला आहे. एकिकडे निसर्गाच बदलत चक्र दुसरीकडे किटकनाशक कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर झालेली फसवणुक त्यात आता कर्नाटकच आंबा कोकणचा हापूस म्हणून बाजारात विक्रीच्या वाटेवर आहे…

निसर्गाच्या गेल्याकाी वर्षातील लहरीपणाने कोकणातील हापूस आंब्याची वाट अधिकच बिकट बनली आहे. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी एक म्हण आहे. अशीच काहीशी अवस्था कोकणच्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांची झाली आहे. कोकणातील आंबा, काजू बागायतदाराचे फारच बिकट वाट बनली आहे. कोकणात एप्रिल महिन्यात कोकणातील हापूस आंबा बाजारात विक्रिला यायचा बागायतदार शेतकऱ्यांना आंब्याला चांगला दर मिळायचा. परंतु यावर्षी कोकणातील हापूस आंबा बाजारात कुठेच दिसत नाही. कोकणातील हापूस आंबा यावर्षी कोकणातच दुर्मिळ झाला आहे. एकिकडे जगातली युद्धजन्य स्थिती त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यवसाय देखिल अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा आहे. प्रचंड जाणवणारा उष्मा यामुळे सारेच भविष्य अंधकार बनले आहे.
कोकण प्रांतात कधीही हार मानून जगणारी माणसं नाहीत यामुळे जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरे जात काम करत रहाण्याचा कोकणवासियांचा स्वभावगुण आहे. कोकणातही अनेकवेळा फार बिकटस्थिती निर्माण करतो. परंतु निसर्गाने निर्माण केलेल्या परिस्थितीलाही सामोरे जात काम करत रहातात. हे खर असले तरी यावेळी कोकणातील शेतकरी चारहीबाजूने अडचणीत सापडला आहे. एकिकडे निसर्गाच बदलत चक्र दुसरीकडे किटकनाशक कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर झालेली फसवणुक त्याबाबतीत शेतकऱ्यांनी वेळोवेळी लाखो रूपये खर्च करून फवारणी केली. परंतु फवारणी करूनही त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसला नाही. उलट शेतकऱ्यांना लाखो रूपयांची औषध कंपन्यांकडून केवळ आंबा बागायतदारच नव्हे तर काजू बागायतदारांच्या बाबतीतही तसेच घडले आहे. आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी ज्या-ज्या वेळी आंबा, काजू पिक वाचाव यासाठी औषध फवारणी करणे आवश्यक होते. तेव्हा-तेव्हा बागायतदार शेतकऱ्यांनी औषध फवारणी केली. परंतु या औषधांच्या फवारणीमुळेही कोणताही फारक पडलेला नाही. यामुळे औषध कंपन्यांनी जी किटकनाशक तयार केली ती पूर्णपणे बोगस असल्याचा आरोप आता बागायतदार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. जेव्हा बदलत्या हवामानाने आंबा, काजूचा मोहोर करपलेल्या स्थितीत दिसू लागला तेव्हा तत्काळ बागायतदार यांनी औषध फवारणी करून त्याचा काही परिणाम घडेल असे वाटले होते. परंतु त्याचा कोणताही परिणाम आंबा, काजू झाडांवर झालेला नाही. हवामानाच्या बदलात १५ टक्के इतकेच आंबा पिक आले. आंबा, काजू बागायतदार शेतकरी दोन्ही बाजूने आर्थिक संकटात सापडला आहे. एकतर आंबा, काजू पिक वाचवण्यासाठी बागायतदारांने हजारो रूपये खर्च करून आंबा, काजू विक वाचवण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्याचा कोणताही परिणाम आणि उपयोग मात्र झालेला नाही. त्यामुळे आंबा, काजू पिक तर नाहीच आणि त्यावर औषध फवारणीचा झालेला दामदुप्पट खर्चामुळे बागायतदार शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
या सगळयाचा परिणाम कोकणातील आंबा विक्रीवरही झालेला आहे. कोकणातील बाजारपेठांमध्ये आंबा पिक अत्यल्प असल्याने बाजारात विक्रीला आंबा दिसत नाही. मात्र, कर्नाटकच आंबा कोकणचा हापूस म्हणून बाजारात विक्रीला येतोय. गेल्याकाही वर्षात कोकणासह महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मुंबईच्या बाजारात कोकणचा हापूसच्या नावावर कर्नाटकचा आंबा विक्रीला येत आहे. एवढच कशाला कोकणातील हमरस्त्यावर कर्नाटकचा हा आंबा काही वर्षांमध्ये जागो-जागी स्टॉल लावून विक्री करणारे आपण पहात आलो. यावर्षी तर कोकणात हापूस आंब्याच पिक फारच नगण्य आहे. त्यामुळे त्याचाच गैरफायदा अन्य राज्यातील आंबा व्यवसायिक उचलण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील आंबा कोकणचा हापूस आंबा म्हणून विकला जातो. दुर्दैवाने आंबा बागायतदार शेतकरी याबाबतीत संघटीतरित्या कोकणच्या हापूस आंब्याच्या बाबतीतल अतिक्रमण रोखण्याची आवश्यकता आहे. परंतु याबाबतीतली गंभिरता बागायतदार शेतकऱ्यांनी कधी दाखवली नाही. ग्राहकांना कोकणातील हापूस आंबा वाटावा म्हणून कर्नाटकचा आंबा विकणारे व्यावसायिक कोकणात प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकांचे पेपर बॉक्समध्ये टाकतात. त्यामुळे हा कर्नाटकचा आंबा कोकणातील हापूस आंबा म्हणून विकला जातो. फसवणुकीचे कितीतरी फंडे वापरले जातात. अलिकडे एकतर वर्षभर बाजारात अनेक भागातून आंबा येतो. त्यामुळे बाजारपेठांमध्ये वर्षभर जगभरातून येणारा आंबा दिसतो. कोकणातील हापूस आंब्याची चव त्याचा स्वादिष्टपणा दुसऱ्या कुठल्याही आंब्याला येणारा नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु ग्राहक जेव्हा आंबा खरेदी करून घरी नेईल तेव्हा त्याची चव चाखणार तोपर्यंत कर्नाटकचा आंब्याची पेटी ग्राहकाच्या घरात गेलेली असते. गेल्याकाही वर्षामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आंब्याची मोठयाप्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील काही भागांमध्ये आंब्याच पिक चांगल येत. त्यात कर्नाटक राज्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनीही आंबा बागायतीतही इतर शेतीप्रमाणेच अधिक लक्ष घातले आहे. त्यामुळे जसा गुजरातमध्ये आंब्याच्या विविध जातीचे आंबा पिक घेतात, आंब्याच्या बागा निर्माण केल्या आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्याने आंबा बागायतीत लक्ष घालून तिथल्या बागायतदार शेतकऱ्यांनी कोकणासह महाराष्ट्रातील काही भागात आंबा पाठवित आहेत. त्यामुळे ग्राहकाला आंबा मिळतो. ऋतुचक्राच्या लहरीपणात कोकणचा आंबा यावर्षी तरी हरवलाय. या ऋतुचक्रात कोकणचा आंबा हरवला आणि आंबा बागायतदार शेतकरी संकटात सापडला आहे. हवामानातील सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम कोकणातील आंबा, काजू, कोकम, जांभुळ या प्रमुख फळ पिकांवर झालेला दिसतो. याच हवामानाचा परिणाम कोकणातील मासेमारी करणाऱ्या मच्छिमारी व्यावसायिकांनाही बसलेला आहे. यामुळे कोकणच्या आर्थिकतेवर त्याचा एक वेगळा विपरित परिणाम झालेला दिसतोय. त्याची गंभिरता आणि आर्थिक झळ मोठ्याप्रमाणावर बसणारी आहे.