सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांचे गौरोद्गार
शिक्षक समिती मालवणचा विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा संपन्न
अमित खोत | मालवण : शिक्षकांच्या न्याय्य हक्कांबरोबरच विद्यार्थी आणि शिक्षणाच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षक समिती अविरत कार्य करणारी संघटना आहे. शिक्षक समिती सातत्याने शिक्षणा बरोबरीने समाजाभिमुख उपक्रम राबविते यामुळे ही संघटना सतत पुढेच जात राहील. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालवणच्या वार्षिक विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळ्यात बोलताना केले.
शिक्षक समिती मालवणचा वार्षिक विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा समर्थ हॉल कोळंब येथे पार पडला. यावेळी उद्घाटक वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, शिक्षक समितीचे राज्य महासचिव राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, नंदकुमार राणे, शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, संचालक मंगेश कांबळी, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर, सचिन मदने, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश गरुड, धीरज हुंबे, माजी संचालक राजेंद्रप्रसाद गाड यांसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. साटविलकर यांनी शिक्षक समितीच्या कार्याचे कौतुक केले. तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, शाळांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, शिक्षकांना सक्षम वातावरण मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, गुणवंत शिक्षक यांचा यथोचित गौरव करण्यात आला. तसेच दत्तक विद्यार्थी यांचे साठी शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. प्रदीर्घ अशा सेवाकालानंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला.
सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी मालवण तालुक्यातील शैक्षणिक वातावरण अधिक सुदृढ करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे सांगितले. राज्य महासचिव श्री. कोरगावकर यांनी शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समस्या मांडताना संघटन चळवळीचे महत्व विशद केले. गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी मालवण तालुक्यात शिक्षकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू असे सांगितले. जिल्हाध्यक्ष श्री. गवस यांनी जिल्हयातील शैक्षणिक समस्या सोडवणुकीसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून लोकप्रतिनिधी निश्चित साथ देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमात शिक्षक पतपेढीचे संचालक नारायण नाईक, संतोष मोरे, विजय सावंत, संतोष राणे, श्रीकृष्ण कांबळी, सीताराम लांबर, ऋतुजा जंगले, तालुकाध्यक्ष महेश काळे, गोविंद शेर्लेकर, मालवण तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी विनोद कदम, उन्नती कराळे, राजन जोशी, रामचंद्र कदम, तालुका सरचिटणीस नंदकिशोर पाडगांवकर, उपाध्यक्ष विकास घाडीगावकर, कार्याध्यक्ष महादेव असरोंडकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा नेहा तांबे, सचिव भाग्यश्री वाडकर, केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी, श्रीकृष्ण सावंत, सत्यवान घाडीगावकर, ज्यूनिस गावित, विवेक माईणकर यांसह जिल्हा, तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मालवण महिला आघाडीने सुश्राव्य ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस नंदकिशोर पाडगांवकर यांनी, सूत्रसंचालन बाळकृष्ण नांदोसकर यांनी तर आभार नंदकिशोर पाडगांवकर यांनी मानले. स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्यात महिला व पुरुष शिक्षक यांनी सुंदर सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली. शेवटी लकी ड्रॉ सोडत या अंतर्गत भाग्यवान विजेते यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालवण समिती सर्वांनी मेहनत घेतली.
L








