रत्नागिरी : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नसिंधू केसरी हा मानाचा किताब रत्नागिरीतील मांडवी येथील मारुती बिर्जे यांनी पटकावला.

शेवटपर्यंत अतीतटीच्या लढतीत मारुती बिर्जे यांनी बाजी मारली. त्यांनी चिपळूणच्या घडशी यांना चितपट केले.भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि मान्यवरांच्या हस्ते रत्नसिंधू केसरीची मानाची गदा आणि मानपट्टा देण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी मांडवी समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी झाली होती.











