रत्नागिरी : जिल्ह्यातील नामांकित कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर , रत्नागिरी येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारा चि.मयुरेश संजय पाटील याने अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत १५० पैकी १५० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.चि.मयुरेशला मुख्याध्यापिका सौ.कदम बाई , वर्गशिक्षक श्री.शिंदे सर व सौ.सागवेकर बाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्याच्या या उज्वल यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.












