मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त १५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७:०० ते १०:०० पादुका पूजन, होमहवन, सकाळी १०:३० ते १२:०० नामस्मरण, दुपारी १२.०० ते १:०० महाआरती, दुपारी १:०० ते ३:०० महाप्रसाद, दुपारी ३:०० ते ४:०० श्री स्वामी कृपा तारकमंत्र पठण
, दुपारी ४:०० ते ८:००
भक्तीगीताचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव नंदकुमार पेडणेकर यानी केले आहे.











