एस एस पी एम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या द्वितीय सत्र निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग विभागातून कुमारी. समृद्धी गावडे हिने ९.३२ SGPI सह विद्यापीठात सहावा क्रमांक मिळवला आहे. तसेच कॉम्प्युटर विभागातून कुमारी. धनश्री म्हाडगुत हिने ९.४१ sgpi सह विद्यापीठात २५ वा क्रमांक मिळवला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातून स्वराज मालये याने ८.९५ sgpi व श्रेयस खाडे याने ८.८२ SGPI सह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. कॉम्प्युटर विभागातून प्रसाद लाड ९.०० sgpi व धनश्री म्हाडगुत ८.९१ sgpi सह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला आहे. महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत या वर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांची कठोर मेहनत आणि सर्व प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शनाचे फळ आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एस बाडकर, संस्थापक सन्मा. नारायणराव राणे, अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष डॉ. निलेशजी राणे, सचिव निलेशजी राणे यांनी अभिनंदन केले आणि भविष्यातील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.










