महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र चिपळूण येथे मंडळाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला . कार्यक्रमानिमित्त सकाळच्या सत्रात गुरुकुल संस्था खेर्डी येथे १५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी चिपळूणच्या वनअधिकारी समृद्धी काटकर गुरुकूल चे डायरेक्टर संजय दरेकर गुरुकुल कॉलेजचा शिक्षक व शिक्षकेतर वर्ग विद्यार्थ्यांसह उपस्थित होता. सायंकाळच्या सत्रात विजकुमार जोशी प्रस्तुत स्वरसुगंध हा मराठी भावगीत भक्तीगीत लोकगीत व सिनेगीत असा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वर्धापन दिनी चिपळूणचे मुख्याधिकारी संजय जाधव, प्रसाद साडविलकर नगरसेवक गणेश आग्रे, संगीतज्ञ राजाभाऊ शेंबेकर, नाट्यकर्मी मंगेश डोंगरे, गुणवंत कामगार सर्वश्री संजय सुर्वे, शिवाजी शिंदे, संतोष मोरे, कामगार संघटना अध्यक्ष तुषार घाग नेरोलॅक, श्रीधर सावंत हिन्दुस्थान युनिलिव्हर, गणेश हळदे, राम डिगे, मयूरेश बोरकर, अनसेज कंपनी, अनंत गायकवाड डॉर्फ केटल, सिताराम चव्हाण- एक्सेल इंडस्ट्रीज दिपक गायकवाड केद्रप्रमुख महाड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना प्र कामगार कल्याण अधिकारी राजेन्द्र निकम यांनी मागील आर्थिक वर्षातील लाभार्थी व लाभाची रक्कम जाहीर करत चालू आर्थिक वर्षातील लाभार्थी वाढ कशी करता येईल यांचे नियोजन मांडले. कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री स्व . वसंतराव नाईक यांची प्रतिमा पुजन, दिपप्रज्वलन व कृषी दिनानिमित्त रोपसंवर्धन व सन २०२५-२६ या वर्षातील प्रथम १० योजना लाभार्थी कंपन्यांच्या फलकाचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करत सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन संस्कृती शिंदे स्नेहा चव्हाण ‘ ज्योती गाडे ‘ अक्षता जोशी, ऋतुजा जोर्वेकर, स्मिता शिंदे, नम्रता खेडेकर यांनी केले.