खेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिवादन

खेड (प्रतिनिधी) – भारतीय संविधानाचे शिल्पकार, बहुश्रुत विद्वान आणि तत्त्वज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त खेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तीनबत्ती नाका, खाबतळे येथील जिजामाता उद्यानात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष अँड वैभवजी खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या सोबत जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते श्री. रहिम सहिबोले उपस्थित होते. तसेच विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी वहिनी वैभव खेडेकर, नगरसेविका सौ. स्वप्नाली ताई राकेश चव्हाण, वैजेश सागवेकर यांच्यासह युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर यांनीही सहभाग घेतला.
कार्यक्रमाला सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, अल्पेश पवार, विजय गुप्ता, प्रशांत बारटक्के तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या समाजउद्धाराच्या कार्याची आठवण करून देत उपस्थितांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.