ऐन रणरणत्या उन्हात राजापूर शहर वासीयांना पाणीटंचाईच्या झळा
कोदवली धरणातील पाण्याची पातळी खालावली
राजापूर | प्रतिनिधी वाढत्या उष्ण तापमानामुळे पाणीसाठयांवर परिणाम होऊ लागला आहे. कोदवली येथील सायबाचे धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे, तर शिळ जॅकवेलकडील पाणीपुरवठयातही खंडीत होणाऱ्या विजपुरवठयामुळे व्यत्यय निर्माण होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा टिकून रहावा व शहरवासीयांना पावसाळा सुरू होईपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी राजापूर नगर परिषद प्रशासनाने बुधवार १५ एप्रिल पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन रणरणत्या उन्हात राजापूर शहर वासींना पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांतील वाढत्या उष्म्म्यामुळे कोदवली येथील सायबाचे धरणातील पाणीसाठा घटू लागला आहे. तर, वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शीळ जॅकवेलच्या येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात अडथळे येत आहेत. त्याच्यातून, शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. सद्यस्थितीतील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेवून नगर परिषद प्रशासनाकडून आतापासून पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना एक दिवसा आड पाणीपुरवठ्याला सुरूवात केली आहे. तशी माहिती मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
पाणीपुरवठ्याचे नियोजन पुढीलप्रमाणे
बुधवारी १५ एप्रिलपासून शहारात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार असून बुधवारी विभाग चव्हाणवाडी विभाग रुमडेवाडी, शेट्ये, धालवलकरघाटी, भटाळी वेदशाळा, पंचायत समिती, गोरुले लाईन, कोर्टापासून आंबेडकर वस्तीगृह पर्यंत, यश अपार्टमेंट, टेलिफोन एक्सेंज, खडपेवाडी, जवाहरचौक, भटाळी, मुल्लावठार, झरीलाईन खान, खलिफे वगैरे काझी, चव्हाणवाडी, परिटघाटी, व्यायामशाळा. बाजारपेठ विभाग भोगटे लाईन, आशियान बिल्डींग, कुडाळकर लाईन, नाखवा, खतीब, संत रोहिदासवाडी, बौध्दवाडी, वरचीपेठ, मापारीलाईन मुन्शी नाका ते जवाहरचौक, बाजारपेठ मिरजकर घाटी, सनामुल्ला, मुन्शीनाका ते लोकमान्य हॉटेल मिरजकर बिल्डींग विचारे लाईन, डॉ. बावकर, पारकर वगैरे, लिगम घाटी, बारगीर, रेस्ट हाऊस, कातारी, मांजरेकरघाटी, जावकरघाटी, बक्कर लाईन, बाकाळकर लाईन, साईनगर पुनर्वसन विभाग, सनम लाईन, प्रियदर्शनी नं. 2 (मेस्त्री गुरव वगैरे). रानतळे विभाग ः मुजावर, मुल्ला मास्तर रेवाळे दुकानापर्यंत असा पाणीपुरवठा होणार आहे.
गुरुवार १६ एप्रिल पासून पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणारा विभाग ः कोंडेतड विभाग ः बारगीर, काझी, सातकुट घाटी मोकाशी लाईन, कोंडकर लाईन पर्यंत, वाडीवाले, हवालदार लाईन, मुजावर लाईन, भंडारवाडी, बौध्दवाडी, कुर्ले बठार, कुवेसकर, काझी घरापर्यंत. तालीमखाना पंप हाऊस / पेट्रोलपंप गुरववाडी, रॉयल कॉम्प्लेक्स, चौगुले रेसीडेन्सी इ. रॉयल बिल्डींग, चौगुले रेसीडेन्सी, मालीम बिल्डींग, बंगलवाडी गुरववाडी, एस. टी. डेपो, तांबळ गुरववाडी इ. प्रियदर्शनी बसाहत नं. 1, एस. टी. डेपो, तांबळ गुरववाडी बंगलवाडी गुरववाडी, एसटी डेपो खालील गुरववाडी, भाई जाधव, कोर्ट, कचेरी लाईन, पोस्ट, बावधनकर, चौगुले, गवळी, पवार, काझी वैगेरे. धोपेश्वरघाटी, दिवटेवाडी, खडपेवाडी विभाग ः तांबेलाईन, आरेकर, पवार, डंबे / शिंदे लाईन, लांजेकर, मांडवकर लाईन, दिवटेलाईन, बाणेपार, गार्डी, राडी, लांजेकर, वादक, दुदम, सोगमलाईन, परांजपे वगैरे साखळकर भंडारवाडी लाईन. 1 (2 साखळकरवाडी लाईन), (रहाटे घाटी, पाटकर घाटी, खडपेवाडी), खडपेवाडी/ दातारप्रेस / गुजराळी, बागकाझी, भावेवाडा, घुमक लाईन, गोंडाळ लाईन, खालची ओगलेवाडी, वरची ओगलेवाडी, रानतळे विभाग गोंडाळ, बावधनकर, साखळकर / कोळेकर, मांजरेकर व इतर. रानतळे विभाग ः गोंडाळ, बावधनकर, साखळकर कोळेकर, मांजरेकर व इतर, आंबेवाडी. एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी केले आहे. ज्या ठिकाणी विद्युत पंपाद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्यास त्या भागातील पाणी पुरवठ्याच्या वेळात बदल होऊ शकेल याची नोंद घ्यावे असेही त्यांनी सूचित केले आहे.











