सावंतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

हजारोच्या संख्येने अनुयायी उपस्थित

ओटवणे (प्रतिनिधी ) सावंतवाडी नगरपरिषद व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर परिसरात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आली तर समता सैनिक दलामार्फत मान वंदना देण्यात आली

सकाळ च्या सत्रात अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करत समाज बांधवाना या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले ,उपनगराध्यक्ष ऍड अनिल निरवडेकर ,जि प सदस्य मायकल डिसोजा, ,राष्ट्रीय किसान मोर्चा प्रभारी चंद्रकांत नागावकर माजी नगराध्यक्ष संजीव परब,संविधानिक हितकारणीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळकर, सावली फाउंडेशन च्या संस्थापक सावली पाटकर टिळाजी जाधव, संतोष जाधव इत्यादी उपस्थित होते. समन्वय समितीचे अध्यक्ष जगदीश चव्हाण, सदगुरु यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्च देवून स्वागत केले. समन्वय समितीचे सचिव सगुण जाधव यांनी प्रास्ताविक मांडताना समन्वय समिती राबवित असणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेत माहिती दिली.यावेळी सभापती सुश्मिता जाधव, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले,उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांसह अनेक मान्यवारांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सौ भोसले यांनी 1932 च्या काळी घडलेल्या घटनांचा दाखला देत बाबासाहेब आणि बापूसाहेब यांच्यातील संबंधांना आठवणीना उजाळा दिला.यावेळी नवनिर्वाचित सभापती सुस्मिता जाधव यांनी डॉ. बाबासाहेबांविषयी बोलताना आज आपण जे आहोत ते बाबासाहेबांच ऋण आहे.यामुळेच आपण इथपर्यंत पोचलो.असे सांगत मिळालेल्या संधीचा उपयोग समाजाच्या हितासाठी करणार असल्याचे सांगितले.उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मला हे पद मिळाल्याची भावना व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेबांचे शासनकर्ती जमात का व्हावी हे स्वप्न होते हे स्पष्ट सांगून आपल्या दोन महिन्याच्या कारकीर्दीत विकासाचा कशी संधी साधून काम केले हे त्यांनी स्पष्ट केले. तर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना चंद्रकांत नागावकर यांनी बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकारण्यासाठी बाबासाहेबांच्या अनुयायानी जीवाची बाजी लावून काम करावे असे आवाहन करून तरुणांनी चळवळीत सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले तर शेवटी अध्यक्षपदावरून बोलताना जगदीश चव्हाण यांनी संविधान रक्षण करणे आपलं कर्तव्य असल्याचे सांगताना समाज हितासाठी झटणे हे आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब,जी.प.सदस्य मायकल डिसोजा, महेश परुळेकर,भाजपचे युवा नेते विशाल परब यांनीही मार्गदर्शन केले.शांताराम असनकर यांनी आभार मानले. रक्तदान केलेल्या रक्तदान रक्तदात्यांचा सन्मान तसेच तसेच पार पडलेल्या भीमगीत गायन स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या प्रज्ञा सूर्य महिला समूह असोली, द्वितीय क्रमांक विजेत्या उत्कर्षां महिला समूह आडेली, तर तृतीय क्रमांक प्राप्त पंचशील महिला समूह सरमळे यांना तसेच उत्तेजनार्थ सिद्धार्थ नगर महिला समूह नेमळे आणि रमाई कलाविष्कार मडुरा यांनाही रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगुण जाधव व चिन्मय जाधव यांनी केले.दुपारच्या सत्रात स्नेह भोजना बरोबरच दुपारच्या सत्रात तांबोळी स्वरधारा चे गायक अमित तांबोळकर निर्मित बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यावर आधारित भीम गीतांचा बहारदार “भिमांजली” या बहारदार गायनाच्या कार्यक्रमाचाही आस्वाद उपस्थितानी घेतला . दरम्यान सायंकाळी उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीतुन भीम अनुयायांनी आपल्या समाजाच्या एकीच दर्शन घडवीत वातावरण भीममय करून टाकलं. या जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीला सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचे, स्वयंसेवकांचे ज्ञात अज्ञात सर्वांचेच समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.