*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सुरू केला होता थांबा
*आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आले यश
* नांदगाव पंचक्रोशी,देवगड, वैभववाडी, खारेपाटण येथील जनतेनी मानले आभार
नांदगाव वार्ताहर
नांदगाव रोड रेल्वे थांबा येथे राज्य राणी तुतारी एक्स्प्रेसला आजपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने था़ंबा मिळाला.त्यांचे प्रवाश्यांनी आभार व्यक्त केले.तर दशक्रोशीतील भाजप कार्यकर्ते व त्रिमुर्ती रिक्षा संघटना नांदगाव रेल्वे स्टेशन यांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करून तुतारी एक्सप्रेसचे जंगी स्वागत करून लाडू वाटप केले.हा थांबा मिळवा यासाठी आमदार नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्याबद्दल जनतेने त्यांचे आभार मानले.
यावेळी भाजप कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस,माजी सभापती मनोज रावराणे, त्रिमुर्ती रिक्षा संघटना नांदगावचे सर्व पदाधिकारी, चालक, मालक,यांच्या सह संतोष रावराणे,अजय रावराणे,प्रविन पन्हाळकर,मनाली गुरव,भाई मोरजकर,अनुजा रावराणे,सुनील लाड,छोटू पारकर,अमृत चौगुले, रविंद्र सावंत,दोमोदर नारकर,बाबू घाडी अशोक बोभाटे, सुनील रावराणे, अलंकार रावराणे, महेंद्र रावराणे, प्रदिप रावराणे, सचिन राणे,प्रविन सावंत, स्नेहलता नेगवे, कल्पना सावंत, रमेश तेली, अर्चना किल्ले, अनिता पवार, प्रियांका साळसकर, संदिप गुरव दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपचे कणकवली तालुका अध्यक्ष संतोष कानडे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नारायण राव राणे यांच्या प्रयत्नाने व आमदार नितेश राणे पाठपुराव्यामुळे कणकवली व देवगड तालुक्यातील प्रवासी वर्गाची होणारी गैरसोय व त्यांना नाईजास्तव कणकवली स्थानकात उतरून पडणारा आर्थिक भुर्दंड दूर झाला.त्यामुळे सर्व प्रवासी वर्गाच्या वतीने नारायण राव राणे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव,आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.











