आयडीबीआय बँक रत्नागिरीकडून सी.एस.आर.(CSR) निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी साहित्य वितरण

रत्नागिरी : आयडीबीआय बँक, रत्नागिरी शाखेकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधी अंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य विभागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय साहित्यांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमांतर्गत एकूण ११२ एक्झामिनेशन टेबल, १०० अल्ट्रासोनिक नेब्युलायझर आणि १०५ फिटल डॉपलर यांसारख्या अत्यावश्यक उपकरणांचा समावेश असून, ही साधने ग्रामीण आरोग्य सेवेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व बांधकाम समिती सभापती विलास चाळके, जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वेदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) सागर पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये ,तसेच समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, शिक्षण व अर्थ समिती सभापती नंदकुमार मुरकर, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती महेश नाटेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती मयुरी शिर्के, तसेच स्थायी समिती सदस्य महेश म्हाप, महेंद्र झोपडेकर, रमेश सूद, ऐश्वर्या घाडवे, शिवानी सावंत उपस्थित होते.
आयडीबीआय बँकेच्या वतीने मुख्य महाव्यवस्थापक आशुतोष कुमार यांनी CSR अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांच्या तसेच क्षेत्रीय महाव्यवस्थापक सुब्रमण्यम एन., उपमहाव्यवस्थापक (पुणे झोन) तुषार बोडस ,शाखाधिकारी रत्नागिरी अमोल पुजारी यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सुविधा अधिक सक्षम होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आयडीबीआय बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत भविष्यातही अशा प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नमूद केले.