ज्ञानदीप पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण
सावंतवाडी । प्रतिनिधी : ज्ञानदीप हे इतरांना प्रेरणा देणारे मंडळ आहे.कलागुणांचे कौतुक करणारे,दिशादर्शक,सामाजिक भान जपण्यासाठी कार्यरत आहे,सलग सोळावर्षे ही संस्था विविध उपक्रम राबवून प्रोत्साहन देण्याचे कार्यकरीत आहे.हे जिल्हावाशींयाना अभिमान वाटावे असे आहे.
जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न होणेआवश्यक आहे.राज्यात नव्हेतर देशात शैक्षणिकक्षेत्रात आपले विद्यार्थी चमकले पाहिजेत असे मौलिकविचार अध्यक्षपदावरुन उद्योजक पुष्कराज कोले यांनी ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीराम वाचन मंदिरात व्यक्त केले
प्रारंभी सरस्वतीपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
प्रास्ताविक वाय.पी.नाईक करुन गेल्या सोळा वर्षात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला.
कु.सम्रुधी सावंत,केतकी सावंत यांनी इशस्तवन,स्वागत गीत सादर करून मंत्रमुग्ध केले
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,पुष्कराज कोले,वाय.पी.नाईक,सौ.उषा परब यांच्या हस्ते २०२१ – २२ चे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
गौरवपत्र,सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ,फेटा बांधूनगौरवविण्यात आले
सागर चव्हाण,(संपादक) शिवराम जोशी(माजी सैनिक)बाळू कांडरकर(संगीत)अनुष्का ना.कदम (उपक्रमशील शिक्षिका) शामल मांजरेकर(कवयित्री)प्रा.एस.एन.पाटील,हेमा नाईक,सूर्यकांत सांगेलकर,सुनील नाईक,या पुरस्कार विजेत्यांना सन्मानीत करण्यात आले.
तसेच यावेळी सौ.रेखा भुरे(संचालिका) मिलिंद गुरव(सिनेअभिनेता) कु.जयदीप खोडके(शौर्य सन्मान) डॉ.मिलिंडा परेरा(दिल्ली सरकारी आयुर्वेदिक काँलेज)तेजस्वीनी कांबळे( सुवर्णपदक मराठी विषय..बेळगाव)यांनाही सन्मानीत करण्यात आले.
यावेळी उषा परब,नागेश कदम,शामल मांजरेकर,शिवराम जोशी,सूर्यकांत सांगेलकर,यांनीही आपले मनोगतव्यक्त केले.
शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांनीही पुरस्कारविजेत्यांना शुभेच्छा देऊन ज्ञानदीपला सहकार्य करु असे प्रशंसोद्गागार काढले.
व्यासपीठावर पुष्कराज कोले,दीपककेसरकर,उषा परब,वाय.पी.नाईक,जावेद शेख,एस.आर.मांगले,रेश्मा भाईडकर,प्रा.रुपेश पाटील,विनायक गावस,उपस्थित होते.
यावेळी प्रा.एन.बी.कारवेकर, विलास कासकर,सलीम तकीलदार,मनोहर मोरे,रमेश काकतकर,राजू मुतकेकर,एस.व्ही.भुरे,पृथ्वी जाधव,आदीमान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.रूपेश पाटील,आभार निलेश पारकर यांनी मानले.
Sindhudurg