सावंतवाडीत भक्तिपूर्ण वातावरणात वारकरी मेळावा संपन्न

Google search engine
Google search engine

संतसेवा पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून सावंतवाडीत वारकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त सावंतवाडी शहरात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या वारकरी मेळाव्यात संतसेवा पुरस्कार प्राप्त वारकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

 

या वारकरी मेळाव्याला शिक्षणमंत्री दीपक केसरकर वारकरी मेळाव्यात सहभागी झाले. याप्रसंगी जिल्हा वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष. ह भ प विश्वनाथ गावंढळकर महाराज यांच्या हस्ते मंत्री केसरकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग च्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे मानाचे ‘संतसेवा पुरस्कार ‘ यावर्षी ह.भ.प.सिताराम परब आंब्रड ता.कुडाळ, ह.भ.प.गणपत पांचाळ आखवणे ता.वैभववाडी, ह.भ.प.रामचंद्र गाड सासोली ता.दोडामार्ग यांना या मेळाव्यात हे पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव श्री राजू राणे, खजिनदार मधुकर प्रभुगावकार उपस्थित होते.

सकाळी वारकरी दिंडी, हरिपाठ, वारकरी मेळावा, दिनदर्शिका प्रकाशन व संतसेवा पुरस्कार प्रदान सोहळा आदी कार्यक्रम पार पडले. शहरामध्ये प्रथमच भव्य वारकरी मेळावा पार पडला. मोठ्या संख्येने वारकरी बांधव या मेळाव्यात सहभागी झाले होते.

Sindhudurg