रत्नागिरी ः प्रतिनिधी
लांजा येथील रेल्वेट्रॅकवर जखमी अवस्थेत सापडून आलेल्या अज्ञात तरुणाचा उपचारांदरम्यान शनिवार 18 एप्रिल रोजी दुपारी 1.41 वा. सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी लांजा येथील रेल्वेट्रॅकवर अज्ञात तरुण पडल्यामुळे गंभिर जखमी अवस्थेत रेल्वेट्रॅकमनला दिसून आला होता. त्याने याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती देताच त्यांनी रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्या अज्ञात तरुणाचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.












