वेंगुर्ले खालची गावडेवाडी येथील युवकाचा बागेत मृत्यू..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले शहरातील खालची गावडेवाडी येथील राजाराम उर्फ राजू गिरीधर गावडे (वय ५३) या युवकाचा मृतदेह त्यांच्या घरापाठीमागील माड बागायतीत आढळून आला. या बाबत वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम गिरीधर गावडे (५३) हे दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारांस आपल्या घरामागील माड बागायतीत गेले होते. त्या भागात सायंकाळी उशीरा म्हणजे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारांस राजू गावडे मयत स्थितीत आढळले. याबाबतची खबर पुंडलीक गावडे यांनी वेंगुर्ले पोलीसांत दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक तुकाराम जाधव, पोलीस हवालदार वैभव पाटील, महिला पोलीस संध्या गुरव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून पोलीस पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस दिपा मठकर करीत आहेत.