देवरूख (प्रतिनिधी):
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (एच. एस. सी.) निकाल ८८.७५% लागला आहे.
महाविद्यालयातून गुणानुक्रमे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा शाखानुसार निकाल खालील प्रमाणे:-
कला शाखा: पहिला: अनय रामचंद्र घनवटकर, दुसरा: स्वरूप धिरेंद्र मांजरेकर, तृतीय: रिया संतोष पड्ये, चौथा: अपूर्वा उदय भोसले, पाचवा: कौशिक महेश लिंबूकर.
वाणिज्य शाखा: पहिला: पायल प्रितम बांडागळे, दुसरा: प्रणित मिलिंद मांडवे, तिसरा : अनुष्का अशोक घाणेकर, चौथा: प्रणाली दीपक पर्शराम, पाचवा: यश सुनील पर्शराम.
एम. सी. व्ही. सी. शाखा: पहिला: आकांक्षा निलेश घवाळी, द्वितीय: प्रेरणा लक्ष्मण शिंदे, तृतीय: पूर्वा दिनेश करंडे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, कार्यालयीन अधीक्षिका मिता भागवत, अक्षय भुवड, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.












