खेड(प्रतिनिधी) ओमळी चिपळूण येथील नीलिमा चव्हाण या २४ वर्षीय युवतीचा दाभोळ खाडीत आढळून आलेल्या संशया स्पद मृत्यू प्रकरणी मारेकऱ्याला तात्काळ जेरबंद करा या मागणी साठी खेड मधील सर्व पक्षीय एकवटून येथील पोलीस प्रशासन यांना निवेदन सादर केले
दाभोळ खाडीत संशयास्पद आढळून आलेल्या नीलिमा चव्हाण या युवती चा मृतदेहाची अक्षरशः विटबना करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर जन माणसातून संताप व्यक्त होत आहे यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत मारेकऱ्याच्या मुसक्या आवळून त्याला लवकरात लवकर फासावर लटकवण्यात यावे या आशयाच्या मागणी चे निवेदन सादर करण्यात आले
निवेदन सादर करण्यात आलेल्या मध्ये खेड तालुका शिवसेना शिंदे गट, महाराष्ट्र नवं निर्माण सेना, महिला आघाडी यांच्या सह विविध सामाजिक संघटना यांनी याबाबत चे निवेदन सादर करून ठोस कारवाई करण्याची मागणी निवेदना द्वारे केली आहे











