कलमठ गुरववाडी येथे धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळला

 

 

 

पोलीस घटनास्थळी दाखल ; कणकवली कलमठ येथे तणावपूर्ण वातावरण

कणकवली : तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित धर्मांतराचा प्रकार ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी ११ वाजता घडली आहे. यावेळी ग्रामस्थ व कथित प्रसारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर काही वेळातच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे दाखल झाले. त्यांनी कथित धर्म प्रसारकांना ताब्यात घेतले, त्यामुळे काही वेळाने वातावरण निवळले. ग्रामस्थानी पोलीस निरीक्षकांकडे संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी या दरम्यान केली आहे.

खोटी अमिषे दाखवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

यावेळी कथित धर्म प्रचारक अतुल भोरे व उषा भोरे यांना तुम्ही इथे काय करता? एकाच धर्माचा प्रसार का करता? जर कथित धर्माचा प्रसार करत असाल तर एक तरी संबंधीत आलेला याठिकाणी आहे का? हिंदू धर्मियांना बोलवून या ठिकाणी खोटी अमिषे दाखवून त्यांचं धर्मांतर करायच आहे का? या अमिषाना गोरगरीब लोक बळी पडत असल्याचा आरोप कलमठ सरपंच संदीप मेस्त्री व स्वप्निल चिंदरकर यांनी केला. याठिकाणी साधारणपणे ४० लोक उपस्थित होते. प्रामुख्याने लहान मुलांचाही यामध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत त्याची फिर्याद पोलिसांनी द्यावी, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, भाजपा तालुका मिलिंद मेस्त्री, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, विजय चिंदरकर, अनुप वारंग, परेश आचरेकर, समर्थ कोरगावकर, पपू यादव, सदानंद चव्हाण विनय गुरव सागर पवार, प्रणय शिर्के, सुरज लोके, प्रसाद देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलिस प्रशासनाची तत्परता

मिळालेल्या माहितीनुसार, गावा बाहेरील काही व्यक्ती कलमठ गावात येऊन स्थानिक नागरिकांना प्रलोभने दाखवत धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. यानंतर गावकऱ्यांनी तातडीने एकत्र येत संबंधितांना जाब विचारला व हा प्रकार पोलिसांना कळवला. माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली. संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचेही समजते.

या कारवाईत पोलीस निरीक्षक तेजस नलवडे, पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, हवालदार सुधीर घारकर, किरण कदम, सागर जाधव, श्रीकांत महामुनी, भूषण सुतार, महिला पोलीस हवालदार कविता सावंत यांच्यासह अन्य पोलीस उपस्थित होते.

कडक कारवाईची मागणी

दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी सरपंच संदीप मेस्त्री यांनी केली आहे.