ना. नितेश राणे यांनी अर्जुन वगळ याच्या व्रतबंध सोहळ्याला भेट देत दिले शुभाशिर्वाद

मुंबई:माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे नातू आणि सिद्धार्थ व सोनाली वगळ यांचा मुलगा ‘अर्जुन’ याचा व्रतबंध (मुंज) समारंभ आज मुंबईत अत्यंत उत्साहात पार पडला. वांद्रे येथील ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलमधील ग्रँड बॉलरूममध्ये हा सोहळा संपन्न झाला.

या मंगल प्रसंगी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी बटू अर्जुनला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत शुभ आशीर्वाद दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, आमदार दीपक केसरकर, सौ. पल्लवी केसरकर, सौ. सोनाली केसरकर-वगळ, सिद्धार्थ वगळ आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून केसरकर व वगळ परिवाराच्या आनंदात सहभाग घेतला.