परूळेचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा व श्री देवी भावई मंदिराचा शिखर कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न…

प.पू मठाधीश श्रीमत दत्तानंद सरस्वती स्वामी यांची उपस्थिती… 

परुळे : प्रतिनिधी

परूळे गावचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा व श्रीदेवी भावई मंदिराचे शिखर कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये थाटात पार पडला. दाभोली (वेंगुर्ले) येथील प.पू मठाधीश श्रीमत दत्तानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते व ढोलताशाश्याच्या गजरात कलशारोहण सोहळा करण्यात आला. कलशारोहण सोहळ्या मुळे परूळे, कुशेवाडा परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

प.पू . मठाधिपती श्री‌.दत्तानंद सरस्वती स्वामीचे आगमन झाल्यानंतर भाविकांच्या हस्ते स्वामींची पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर श्रीदेव वेतोबा व श्रीदेवी भावई मंदिराच्या कलशाचे स्वामींच्या प्रमुख उपस्थितीत व ब्राह्मण वृंदांच्या मंत्रोचायात कलशारोहण करण्यात आले. २८ मे ते १ मे दरम्यान चार दिवस चाललेल्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कलशारोहण सोहळ्या नंतर दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकाची भजने, त्यानंतर श्री देव वेताळादी पंचायतन देवस्थान न्यास च्या स्मरणिकेचे प्रकाशन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख दत्ता सामंत, वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, देवस्थान अध्यक्ष उमाकांत सामंत, विवेक सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर श्री.तारादेवी नाट्य मंडळ केळूस यांचे संगीत नाटक व माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचे नाटक सादर झाले.