पणन महासंघात संचालक प्रमोद रावराणे यांची उत्कृष्ट कामगिरी 

मंत्री नाम. गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार 

वैभववाडी l प्रतिनिधी :       महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, संचालक मंडळात कोकण विभागातून संचालक म्हणून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल संचालक प्रमोद रावराणे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नाम.गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री. रावराणे यांचा सत्कार करण्यात आला.

पणन मंत्री नाम.जयकुमार रावल, वस्त्रोद्योगमंत्री नाम.संजय सावकारे, महाराष्ट्र राज्य सह.कॉटन फेडरेशनचे अध्यक्ष आम.कुणाल पाटील, महाराष्ट्र राज्य सह.पणन महासंघाचे चेअरमन श्री.दत्तात्रय पानसरे, महाराष्ट्र राज्य सह.कंन्झ्युमर फेडरेशचे अध्यक्ष ,शेकापचे अध्यक्ष आम.जयंत पाटील, पणन मंडळाचे एम.डी. पणन महासंघाचे एम.डी. श्री.कुलकर्णी या सर्व तज्ज्ञ मंडळींचे मोलाचे सहकार्य श्री रावराणे यांना लाभले आहे.

यावेळी पणन महासंघाचे सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.