वैभववाडीत जि.प. च्या दोन जागांसाठी 4 तर पं. स.च्या पाच जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात

14 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे

भाजपाचे प्रमोद रावराणे, साधना नकाशे बिनविरोध

वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 14 उमेदवारानी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात उबाठाच्या जितेंद्र तळेकर यांनी माघार घेतल्याने भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध झाले आहेत. तर तालुक्यातील उर्वरित कोकिसरे व लोरे जिल्हा परिषदेत भाजपा व उबाठा सेना यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. तर या अगोदरच कोकिसरे पंचायत समिती विरोधी पक्षाकडून अर्जंच दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे भाजपाच्या साधना नकाशे बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित पाच मतदार संघापैकी भुईबावडा पंचायतीत चौरंगी, लोरे, खांबळे, उंबर्डे मध्ये दुरंगी लढत होणार आहे. त्यामुळे 2 जिल्हा परिषद साठी 4 अर्ज तर 5 पंचायत समिती साठी 13 अर्ज असे एकूण 17 उमेदवार रिंगणात आहेत.

भुईबावडा पंचायत समितीत भाजपाच्या बंडखोर उमेदवार वासुदेव कामतेकर, अमोल मोरे यांनी उमेदवार अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपचे देवानंद पालांडे, उबाठाचे जितेंद्र तळेकर, उबाठाचे अपक्ष उमेदवार वसंत मोरे, काँग्रेसचे रुपेश गुरव यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

तर कोळपे पंचायत समितीत भाजपच्या उमेदवार माजी सभापती सुवर्णा संसारे यांच्या विरोधात उबाठा सेनेच्या राहीना गुलझार काझी आहेत. यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.

कोकिसरे पंचायत समिततून भाजपाच्या डमी उमेदवार अक्षता डाफळे यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपाच्या साधना सुधीर नकाशे बिनविरोध निवडून आल्या आहेत.

उंबर्डे पंचायत समितीतुन भाजपाकडू साची कोलते, यांच्या विरोधात उबाठा सेनेच्या कुसूर माजी सरपंच स्मिता संतोष पाटील यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.

खांबाळे पंचायत समिती मतदार संघातुन काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजपाकडून माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके तर उबाठा सेनेकडून स्वप्नील रावराणे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. लोके हे तिसऱ्या वेळी निवडणूक लढवत आहेत. या अगोदर दोन वेळा त्यांनी या मतदार संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

लोरे पंचायत समितीतून भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष बोडेके यांनी आपला उमेदवारवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याचप्रमाणे भाजपचे डमी उमेदवार ओंकार रावराणे, वासुदेव रावराणे,  जयसिंग रावराणे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. सिद्देश रावराणे हे भाजपाकडून उमेदवार आहेत. तर उबाठा सेनेकडून माजी सभापती लक्ष्मण रावराणे तसेच मनसेचे बागवे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

तर जिल्हा परिषद कोकिसरे मधून नमिता दळवी या भाजपच्या डमी उमेदवार यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपाकडून माजी जि. प.बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या सुनबाई श्रावणी  रोहन रावराणे व उबठा सेनेकडून उमेदवार माजी सभापती शुभांगी सरवणकर  रिंगणात आहेत. याठिकाणी दुरंगी लढत होत आहे.

तसेच लोरे जिल्हा परिषदेतून भाजपाच्या डमी उमेदवार अनुज्ञा अंगवलकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपाच्या रिद्धी रितेश सुतार तर उबाठा सेनेकडून माजी जि. प. सदस्या दीव्या दीपक पाचकुडे निवडणूक रिंगणात आहेत. याठिकाणी सुद्धा दुरंगी लढत होणार आहे.