दिनांक ६ ते ८ मे या कालावधीत पण विविध कार्यक्रमाचे आयोजन
लांजा( प्रतिनिधी): तालुक्यातील भांबेड पवारवाडी येथील श्री औदुंबर दत्त मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक ६ ते ८ मे या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
भांबेड येथील उत्कर्ष मंडळ पवारवाडी भांबेड संचलित श्री औदुंबर दत्त मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा प. पू. गगनगिरी महाराज आश्रम मठाधिपती कोंडीवले मु. ओणी प.पू. उल्हासगिरी महाराज सिद्धयोगी, प.पू. गगनगिरी महाराज यांचे पट्टशिक्षक यांच्या अमृतहस्ते व अध्यात्मिकगुरु श्री उमेश काशिनाथ जंगम आणि सहकारी यांच्या पौरोहित्याखाली संपन्न होणार आहे.
कार्यक्रमांतर्गत बुधवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ४.०० वा. मुचकुंदी नदी पूजन स्थळ पेठदेव भांबेड ते पवारवाडी औदुंबर दत्त मंदिर जल कलश मिरवणूक, गुरुवार दि. ७ मे रोजी स. वा. श्री गणेश पूजा आवाहन, मंडप देवता पूजन, सर्व देवता स्थापना, स्वस्ति पुण्याह वाचन, नवग्रह पूजन, मातृका पूजन, रुद्राभिषेक, सायंकाळी ५.०० ते ७.०० वा. श्रींची भव्य मिरवणूक, सायंकाळी ७.०० ते ७.३० वा. विधीवत धान्याधिवास, जलाधिवास, शयनाधिवास सायंकाळी ७.३० वा. महाप्रसाद भंडारा, सायंकाळी ८.०० ते ९.३० वा. स्वरादिंडी प्रस्तुत संतवाणी सुस्वर भजन, नवी मुंबई, सायंकाळी ९.३० ते ११.३० वा. वन्यवाणी फाउंडेशन, मुंबई निर्मिती मनोरंजनपर प्रबोधनात्मक नाट्यविष्कार असे कार्यक्रम होतील. शुक्रवार दिनांक ८ मे रोजी सकाळी ८.०० वा. रुद्र स्वहाकार (होम हवन), दत्तयाग, प्राणप्रतिष्ठा सोहळा, कळशरोहन सोहळा पार पडणार आहे. तसेच पूर्णाहूती, सामुदायिक महाआरती, सायंकाळी ४.०० ते ६.०० वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि होम मिनिस्टर कार्यक्रम, सायंकाळी ६.०० ते ७.०० वा. श्री पालखी प्रदक्षिणा नाचवणे, सायंकाळी ७.०० वा. दीपोत्सव, सायंकाळी ७.३० वा. महाप्रसाद भंडारा, सायंकाळी ८.०० वा. जीवन विद्या मिशन सद्गुरु श्री वामनराव पै प्रणीत उपासना यज्ञ (हरिपाठ) सदस्य श्री संदीप बने यांचे प्रबोधन विषय सद्गुरु महिमा अघाद, रात्री १०.३० वा. जय भराडीन देवी मंडळ खानवली चिंचवाडी ता. लांजा जि. रत्नागिरी स्त्री पात्रांनी नटलेली कोकणची लोककला “बहुरंगी नमनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी उत्कर्ष मंडळ पवारवाडी भांबेड ट्रस्ट अध्यक्ष गोपीनाथ पवार, कार्याध्यक्ष श्रीधर बाईत, सचिव सुरेश धडम, खजिनदार संदीप सावंत, उपाध्यक्ष संजय सावंत, सहकार्यध्यक्ष चेतन बागवे, सहसचिव मंगेश बाईत, सह खजिनदार विजय पवार, सदस्य प्रकाश बागवे, गजानन पवार, विजय पवार, प्रकाश पवार, मनोज बाईत, श्री दत्त जयंती उत्सव समिती अध्यक्ष दिनेश पवार, सचिव मंगेश बाईक, खजिनदार चंद्रकांत धडम, श्री दत्त मंदिर बांधकाम समिती सल्लागार शिवाजी पवार, सदस्य पांडुरंग सावंत, शांताराम धडम, दत्ताराम पवार, कृष्णा सावंत, औदुंबर दत्त मंदिर पवारवाडी महिला मंडळ व ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. पंचक्रोशीतील भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्कर्ष मंडळ पवारवाडी भांबेड यांच्यावतीने करण्यात आले आहे.












