रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि रत्नमित्र फौंडेशन रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने, निरीक्षण गृह रत्नागिरी येथील मुलांना जेवणासाठी बसणेच्या सतरंज्या /बैठका आणि हातरुमाल यांचे वाटप करणेत आले.
हा उपक्रम अॅड.ममताबेन मुद्राळे यांनी त्यांचा भाचा आदित्य आंबवकर याचे वाढदिवसाच्या निमित्ताने स्पॉन्सर केली होती. त्यावेळी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे अॅड..महेंद्र मांडवकर, रत्नमित्र फौंडेशनच्या सचिव व पोमेंडी बुद्रुक गावच्या लोकनियुक्त सरपंच ममता जोशी, रत्नमित्र फौंडेशनचे सदस्य अंकुश जोशी , लीलाधर कुड, अॅड. मनोज घडशी,अॅड. ममताबेन मुद्राळे, अॅड.उमेश जोशी, अॅड. राकेश पाटील, अॅड.अश्विनी उपळेकर, मंदार मांडवकर, हर्षद मायंगडे, प्राध्यापक धनंजय आंबवकर हे हजर होते तसेच निरीक्षण गृह रत्नागिरी चे प्रथमेश वायंगणकर हे उपस्थित होते.












