रत्नागिरी- सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी खेडमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उद्या शुक्रावार ८ मे रोजी आयोजित करण्यात आले आहे.
श्रीमान द. ग. तटकरे सभागृह, खेड येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबीरात
महसूल विभागातर्फे क्षेत्रीय स्तरावर आणि ग्रामीण भागात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे हा या शिबिराचा उद्देश आहे. महसूल प्रशासनाचे कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये अशा प्रकारच्या मंडल स्तरावर शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.
विभागीय कोकण आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
नागरिकांनी आपल्या महसूल संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडल अधिकारी खेड, खेड मंडळांतर्गत सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि सर्व महसूल सेवक प्रयत्नशील आहेत.
Home महत्वाच्या बातम्या खेड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित; महसूल विभागाचा महत्त्वपूर्ण...













