देवळे चाफवली परिसराला पावसाने झोडपले आंबा काजूचे मोठे नुकसान

शंकर वैद्य | साखरपा
संगमेश्वर तालुक्यातील देवळे चाफवली परिसराला ढगांच्या गडगडटासह वाऱ्या पावसाने जोरदार झोडपले यामुळे आंबा काजूचे फार मोठे नुकसान झाले आहे. हा पाऊस अचानक आल्याने शेतकऱ्यांची फार मोठी धांदल उडाली.
देवळे चाफवली परिसरात आंबा पीक मे महिन्यात जोरदार येत असते काजूही असाच असतो त्यामुळे आंबा काजूचे वादळी वाऱ्यामुळे फार मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदील झाला आहे.मार्च एप्रिल महिन्यात पडलेल्या पावसाच्या तुलनेने आज पडलेला पाऊस, वारा फार मोठा असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला आंबा वाऱ्याने पडला तर उरलेला झाडावर असलेला आंबा पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
लग्न सराई असल्यामुळे शेतीची उरली सुरली मशागतीची कामे मे महिन्याच्या या आठवड्यात सुरू करण्याच्या तयारीत शेतकरी असताना जोरदार आलेल्या पावसाने लाकूड फाटा ही भिजवला आहे. तसेच मशागतीची ही कामे लांबणीवर जाणार आहे. जमीन भिजल्यामुळे शेतीची मशागत आता लगेच करू शकत नसल्याने शेतकरी विचारात पडला आहे. जनावरांची वैरण ही भिजली आहे. शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले आहे.