फाटक हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.सुचिता विश्वनाथ साळवी यांचे निधन

रत्नागिरी | प्रतिनिधी

फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथील सेवानिवृत्त शिक्षिका सौ.सुचिता विश्वनाथ साळवी वयाचे सोमवार दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता कुवारबांव येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८१ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सौ.साळवी बाई यांनी रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध फाटक हायस्कूल मध्ये सहशिक्षिका पदी उत्तमरीत्या सेवा केली. त्यांचे अध्यापन कौशल्य, सहशालेय कार्यक्रमातील सहभाग यामुळे त्यांनी विद्यार्थी प्रिय बाई म्हणून नाव मिळवले होते. साळवी बाई या माजी सहायक उपशिक्षणाधिकारी कै.बा.सी.साळवी‌.गुरुजी यांच्या स्नुषा होत्या.