भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यांचा मंडल दौरा प्रारंभ

रत्नागिरी :

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण चे जिल्हाध्यक्ष यांनी काल संगमेश्वर उत्तर आणि दक्षिण, लांजा उत्तर आणि दक्षिण, राजापूर पूर्व आणि पश्चिम या मंडलाना भेट देत तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यशी संवाद साधला.
संघटनात्मक आढावा तसेच प्रदेशस्तरिवरून आलेल्या विविध कार्यक्रमाचा आढावा प्रत्येक मंडल अध्यक्षांकडून घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी उपस्थितांना पक्षाची भुमिका व्यवस्थितरित्या समजावत मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, अभिजीत गुरव, शितल पटेल, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के,रूपेश कदम,विराज हरमले, शैलेश खामकर, मोहन घुमे, एकनाथ मोंडे उपस्थित होते. पक्ष संघटना मजबुतीकरण होण्याच्या दृष्टीने हा दौरा नक्किच यशस्वी होईल असे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सांगितले.