वेंगुर्ले : प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे रोटरी क्लब ऑफ शिरोडा तर्फे साथरोग नियंत्रणाबाबत माहितीपत्रके वाटप करण्यात आली. पावसाळ्यात विविध किटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होत असतो. यामध्ये लेप्टो स्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुण्या, के.एफ. डी व इतर जलजन्य आजार हे प्रामुख्याने पसरत असतात यामध्ये काही रुग्णांच्या आरोग्याला धोका ही पोहोचू शकतो. याचाच विचार करून रोटरी क्लब ऑफ शिरोडा याच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे साथरोग नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यासाठी 5000 माहितीपत्रक देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी पावसाळ्यामध्ये किटकजन्य आजार व जलजन्य आजार होऊ नये यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ शिरोड्याचे रो. निवृत्ती कृष्णाजी, असिस्टंट गव्हरमेंट रो. सचिन गावडे, माजी अध्यक्ष रो. रत्नदीप मालवणकर, माजी अध्यक्ष रो. अक्षय डोगरे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकित, डॉ. अन्नू बल्हारा, नेत्र चिकित्सक डॉ. गणेश आनंदे, आरोग्य सहाय्यक अंकुश करंगुटकर, औषध निर्माण अधिकारी महाबळेश्वर नाईकगावकर, श्रीम. बोडेकर, श्रीम. कदम, श्रीम. नाईक, सोज, श्री. मसुरकर,श्री. जाधव, श्रीम. गोसावी, श्री. धानजी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Home ताज्या घडामोडी प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे रोटरी क्लब तर्फे साथरोग नियंत्रणाबाबत माहितीपत्रके वाटप












