राजापुर तालुक्यातील अवैध गोवा बनावटीची दारू विक्री तात्काळ बंद करा

उपसभापती अभिजित गुरव यांचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन
राजापूर प्रतिनिधी: राजापूर तालुक्यात अवैध दारु धंद्यासह गोवा बनावटीची दारू विक्री बंद करावी याबाबत राजापूर पोलीसांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याला आळा घालण्यात राजापूर पोलीसांना अपयश आले आहे. तरी तालुक्यातील ही अवैध दारु धंद्यासह गोवा बनावटीची दारू विक्री पुढील १५ दिवसांत बंद करावी अन्यथा जनआंदोलन उभारू असा ईशारा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांनी दिला आहे. याबबातचे एक निवेदन गुरव यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले आहे.
राजापूर तालुक्यातील निष्क्रीय पोलिस यंत्रणेमुळे राजरोसपणे ही दारू विक्री सुरू आहे. अनेकांना यात जीव गमवावे लागत आहेत. याबाबत आपण स्वता तक्रार करूनही पोलीसांनी दखल घेतलेली नाही. राजापुर शहरासह संपूर्ण तालुक्यात गावोगावी गोवा बनावटीची दारु खुले आम विकली जात असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधिन होत आहे. अशा अवेध दारुबंदयाचे समुळ शच्याटन होणे गरजेचे आहे. जनता दरबारातही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, तरीही कार्यवाही केली जात नाही. या अवैध दारु धंद्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे असा प्रश्नही गुरव यांनी या निवेदनात उपस्थित केला आहे.
आपण याची दाखल घेऊन पुढील १५ दिवसात दारू विक्री बंद करावी अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला फार मोठे जन आंदोलन उभे करावे लागेल. आणि याची सर्वस्वी जबाबदारी राजापुर पोलिस स्टेशनची असेल असेही या निवेदनात गुरव यांनी नमुद केले.